
भाड्याच्या घरात राहत असल्याच्या कारणावरून महिलेस तिघांकडून मारहाण
जळगाव | प्रतिनिधी –
शहरातील शाहूनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत असल्याचा जाब विचारत एका महिलेस मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधित महिलेला चावा घेतल्याचाही प्रकार घडला आहे. ही घटना २६ जून रोजी घडली असून, शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकिलाबी शरीफ खान (वय ४०, रा. शाहूनगर) या या परिसरात भाड्याच्या घरात राहतात. स्थानिक तीन जणांनी ‘तू या परिसरात भाड्याने का राहत आहेस?’ असा जाब विचारत त्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वर्तन केले. महिलेनं या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर संतप्त होऊन आरोपींनी तिच्याशी अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली आणि मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, पीडित महिलेला चावल्याचीही तक्रार आहे.
झालेल्या गोंधळात महिलेसोबत तिची मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता, तिलाही आरोपींनी शिवीगाळ करत हातघाईवर येत मारहाण केली.
या प्रकरणी शकिलाबी खान यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भिला पाटील करत आहेत.