जळगाव

नाईट राऊंड करताना हटकले, पोलिसांनी गावठी पिस्तूल पकडले

जळगाव मीडिया (प्रतिनिधी) रात्री पोलिसांची गस्त करीत असतांना तांबापुरा परीसरात महादेव मंदिरा जवळ दोन-तिन इसम हे संशयीत रित्या पायी फिरत असतांना रात्री 01.30 वाजेच्या सुमारास आढळुन आल्याने त्यांना त्यांचे फिरण्याबाबत चौकशी केली.

यावेळी ते उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांचेवर पोलिसांनी संशय आल्याने पोलिसांनी त्यांना चेक केले असता सदर दोन ईसमांपैकी एकाने काळे शर्ट परिधान केलेले होते तसेच दुस-या ईसमाने पिवळ्या रंगाचे शर्ट परिधान केलेले होते त्यापैकी काळे शर्ट परिधान केलेल्या ईसमाच्या डाव्या बाजुस कमरेच्या वर काहीतरी वस्तु लपवल्यासारखे दिसुन आल्याने पोलिसांनी खात्री केली असता त्याचे कमरेजवळ एक गावठी कट्टा मिळुन आला तसेच त्यासोबत असलेल्या मँगजीनमध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आले तसेच त्यांची अंगझडती घेता पँटचे खिशात गांज्या पिण्यासाठी लागणारी चिलम मिळुन आली त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव साहील मोहम्मद तडवी वय 22 वर्षे रा,मच्छी बाजार तांबापुरा ता.जि.जळगाव असे सांगीतले तसेच त्याचे सोबत असलेला पिवळा शर्ट परिधान केलेल्या ईसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव दिपक शांताराम रेणुके वय 21 वर्षे रा.शामाफायर गोडाऊन समोर तांबापुरा ता.जि.जळगाव असे सांगीतले तरी वरिल ईसमांना हत्यार बाळगंण्याबाबत विचारले असता त्यांनी आमचे कडे कोणताही परवाना नसले बाबत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button