गुन्हेजळगाव

रजा नगर-पिंप्राळा परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रजा नगर-पिंप्राळा परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव मीडिया ( वसीम खान ) | शहरातील रजा नगर-पिंप्राळा परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाविरुद्ध रामानंद नगर पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून संबंधित इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रजा नगर-पिंप्राळा परिसरात एक इसम हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवत फिरत आहे.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अंमलदारांसह पथकाने घटनास्थळी जाऊन माहितीची खात्री केली. त्यावेळी संबंधित इसम हातात कोयता घेऊन फिरताना आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत धारदार कोयता ताब्यात घेत संबंधित इसमाला पकडले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा रजिस्टर क्रमांक २४३/२०२६, आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, सुशिल चौधरी, अजय पगारे, अतुल चौधरी, सागर नन्नवरे आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात रामानंद नगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button