गुन्हेजळगाव

मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक प्रोफाईल; चेन्नई सायबर पोलिसांकडून होमगार्डला अटक

मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक प्रोफाईल; चेन्नई सायबर पोलिसांकडून होमगार्डला अटक

​नशिराबाद येथून संशयित ताब्यात; जळगाव न्यायालयातून ट्रान्सिट रिमांड मंजूर

​जळगाव : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करून आक्षेपार्ह मजकूर आणि एआय व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या नशिराबाद येथील होमगार्डला चेन्नई सायबर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (वय ३८, रा. ताजनगर, नशिराबाद) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी चेन्नईच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तपासाअंती सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा मार्ग नशिराबादपर्यंत शोधून काढला. वेस्ट झोन सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. पालवेशम व पथकाने नशिराबाद येथे जाऊन संशयित होमगार्डची कसून चौकशी केली. यानंतर जळगाव न्यायालयातून ट्रान्सिट रिमांड मिळवून चेन्नई पोलिस पथक आरोपीला घेऊन रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button