नारपार गिरणा खोरे प्रकल्प पूर्तीसाठी 16 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा
जळगाव मिडिया ( चाळीसगाव प्रतिनिधि ) – गिरणा खोरे अधिक समृद्ध करणारा नार पार गिरणा खोरे प्रकल्प बाबत राज्यपालांच्या सहीचे पत्र हे फडणवीस सरकारच्या माध्यमातून बळीराजाची शुद्ध फसवणूक आहे. राज्य सरकारकडे पैसा नसल्याने हा प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही हे माहीत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत घेतलेली भूमिका ही बळीराजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचा हेतू आहे. केंद्राच्या निधीतून हा प्रकल्प मंजूर झाला तरच तो साकारला जाऊ शकतो.महाराष्ट्र सरकार हे गुजरात धार्जिणे झाल्याने या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली असून नार पार गिरणा खोरे योजना पुर्तीसाठी आज या प्रकल्पाबाबत सखोल माहिती असणाऱ्या अभ्यासाकांची नियोजित बैठक झाली असून यात राज्य सरकारच्या विरोधात भुमिका घ्यावी असा एकमुखी ठराव करण्यात आला आहे.याकरीता 16 ऑगस्ट रोजी गावागावातून बळीराजा आपले ट्रॅक्टर भरून प्रांत कार्यालयावर
धडक देतील. हा शेतकऱ्यांचा एल्गार नार पार पूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही. अशी भीमगर्जना माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज चाळीसगाव येथे केली आहे.
आज दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथे नारपार प्रकल्प रद्द केल्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात नारपार गिरणा खोरे प्रकल्पाच्या अभ्यासकांची, आंदोलनकर्त्यांची, संघटनांची, पर्यावरण प्रेमी, जलप्रेमी, संस्था समिती, सर्व पक्षीय संघटनांची पुढील आंदोलनासाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीला राज्यभरातून अभ्यासक उपस्थित होते.
सुरुवातीला पांजण डावा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलकांचा परिचय करून दिला.ज्येष्ठ सहकार तज्ञ तथा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ऍड.विश्वासराव भोसले यांनी प्रास्ताविकातून नारपार गिरणा खोरे प्रकल्प बळीराजांच्या आयुष्यात क्रांती करणारा असल्याचे सांगत या प्रकल्पाबाबत सखोल माहिती उपस्थितांना दिली. सुरुवातीला शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज 7000 कोटी वर गेला असून शेतकऱ्यांच्या बाबत शासनाचे उदासीन धोरण कायमस्वरूपी संपवायचे असेल तर गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्राध्यापक के.एन.आहीरे, निखिल पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, ज्येष्ठ नेते सतीशभाऊ दराडे, खान्देश हितसंग्राम संघटनेचे कैलास पाटील वाघडूकर, खान्देश जलपरिषदेचे दीपक पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, खान्देश हितसंग्राम सुरेश पाटील, जि.प.सदस्य शशीभाऊ साळुंखे, राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, गिरणा खोरे बचाव समितीचे विवेक रणदिवे यांनी आपली भूमिका मांडली.
याप्रसंगी कृषी भूषण समाधान पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र बापू पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अशोक खलाणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष रवीभाऊ जाधव, उपसभापती संजय पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सचिव आशुतोष पवार, सहकार सेना जिल्हाप्रमूख आर के पाटील, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, बारा बलुतेदार सेनेचे मुकेश गोसावी, भटक्या विमुक्त जाती सेना जिल्हा प्रमुख मारोती काळे,अल्पसंख्याक आघाडीचे वसीम चेअरमन,लतीफ खान, गयासुद्दिन शेख,रोहित जाधव सर, अनिल चव्हाण, शेतकरी संघाचे संचालक प्रा.एमएम पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.राहुल जाधव, महिला आघाडीच्या एड. कोमलताई मांडोळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ पाटील सर, मिशन पाचशे लिटर संकल्पनेचे शेखर निंबाळकर, सुचित्राताई राजपूत, नगरसेविका सविताताई राजपूत, अभिषेक पवार, प्रा. राजेंद्र सिंग पाटील,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, मंगेश अग्रवाल,सेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, नितीन सूर्यवंशी, देवेंद्रसिंग पाटील, अमोल राऊळ, प्रदेश काँग्रेसचे राहुल मोरे, अर्चनाताई पोळ,रवीभाऊ पोळ, भगवान रणदिवे, गणेश पाटील खानदेशी संग्राम संघटनेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शशिकांत पाटील, गणेश पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश पगारे,मनीष आमले, दिलीप देशमुख, सुधीर पाटील, चेतन वाघ, कचरू सोनवणे, प्रकाश माळी, शेतकी संघ संचालक सुभाष पाटील,सचिन बाविस्कर, मेहुनबारे माजी सरपंच नरेश साळुंखे,सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, राहुल पाटील, दीपक पवार, विवेक बोरसे,भरत पाटील, जयदीप पाटील, गणेश पवार, जयेश पाटील, विनोद चव्हाण, दादाजी चव्हाण,किरण देशमुख, शुभम पवार, मनोहर निकम, वाल्मीक निकम, योगेश निकम,भरत पाटील, किरण निकम, मनोज निकम, दत्तू निकम, ज्येष्ठ नेते पद्माकर दादा पाटील,माजी पंचायत समिती सदस्य रवीभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, डॉ.अमृत पाटील कनाशीकर, प्रा.गौतम सोनवणे, रंगराव पाटील यांच्यासह खानदेशातील जलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
16 ऑगस्ट रोजी एल्गार नारपार गिरणा खोरे बचावासाठी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक गावातून शेकडो शेतकरी ट्रॅक्टर भरून आणण्याचा संकल्प करीत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन राज्यभर आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.