जळगाव प्रतिनिधी :- पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन 6 जानेवारी रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे असतील. दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, ‘लोकमत’ जळगाव आवृत्ती संपादक किरण अग्रवाल, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जैन उद्योग समूहाचे मीडियाप्रमुख अनिल जोशी, राष्ट्रीय करणी सेनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, सातपुडा ऑटोचे संचालक किरण बच्छाव, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघांचे संचालक कमलाकर वाणी, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, दैनिक साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील, पत्रकार संघांचे राज्य कार्यध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागाचे अध्यक्ष किशोर रायसाकडा उपस्थित राहतील.
10 पत्रकारांना ‘दर्पणकार’ पुरस्कार
पुरस्कार विजेत्या पत्रकारांमध्ये प्रिंट मीडियातून- चंद्रशेखर जोशी (तरुण भारत), सुनील पाटील (लोकमत), सुधाकर जाधव (दिव्य मराठी), चेतन साखरे (देशदूत), इलेक्ट्रॉनिक मीडिया- किशोर पाटील (किशोर पाटील), संजय महाजन (साममत), विजय वाघमारे (न्यूज 18 लोकमत), डिजिटल मीडिया- नरेंद्र पाटील, पुढारी (डिजिटल) , निलेश पाटील (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल) व छायाचित्रकार- सचिन पाटील (लोकमत) यांचा समावेश आहे.