भडगावः– तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना तिचा हात पकडून लग्नासाठी धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जात असताना पाठलाग करून तिचा हात पकडून माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला.
तसेच ही मुलगी दुसऱ्या दिवशी शाळेत जात असताना संशयित गोरख कोळी याने तिच्या अंगावर चिठ्ठी फेकून ‘तु जर चिठ्ठी उचलली नाही तर तुला मारुन टाकेल’ अशी धमकी दिली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत पुढील तपास म. पो. कॉ. शामिना पठाण या करित आहे.