नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर
जळगाव I प्रतिनिधी
आपुलकी सेवाभावी फाउंडेशन तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन 23 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.
शहरातील जिल्हा पेठ भागातील गांधीनगर येथील आरा शाळेसमोर नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर सकाळी दहा ते दुपारी एक वाजे दरम्यान डॉ.मनीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. दरम्यान दंत तपासणीनंतर उपचारांमध्ये 50% सवलत मिळण्याचे आयोजकांनी सांगितले.
या मोफत दंत तपासणी शिबिराला प्रसिद्ध ग्रंथाची किचन डॉक्टर शिरीष यांचा घरी आपुलकी फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश पाटील, उपाध्यक्ष मनीषा चव्हाण, सचिव हेमंत जाधव, सदस्य दिलीप नारखेडे ज्योती सुरवाडे आणि अमजद पठाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.