जळगावराजकारणसामाजिक

फौजे-ए-हिंद की जुर्रत को सलाम!

फौजे-ए-हिंद की जुर्रत को सलाम!

सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी पुंछ आणि पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करून देशाच्या २६ वीरांगनांचे संसार उध्वस्त केले. याच घटनेचा बदला घेत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून अतिरेक्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राइक करत त्यांच्या नाशाचा दणका दिला. या पराक्रमाचे स्मरण आणि लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे “फौजे-ए-हिंद की जुर्रत को सलाम” या नावाने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीची सुरुवात सेवा निवृत्त सैनिक एस. डी. वाणी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सै. अयाज अली नियाज अली यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून उपस्थितांना देशप्रेम आणि एकतेचा संदेश दिला. तसेच कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करत भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांच्या शौर्याचे गौरवपूर्ण शब्दांत कौतुक केले.

रॅली भिलपुरा येथून सुरू होऊन घाणेकर चौक, टॉवर चौक, नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. “जय जवान जय किसान”, “फौजे-ए-हिंद की जुर्रत को सलाम”, “भारतीय सैन्याचा विजय असो”, “पाकिस्तान मुर्दाबाद”, “दूध मागाल तर खीर देऊ, काश्मीर मागाल तर चीर देऊ” अशा जोशपूर्ण घोषणा देत रॅलीत राष्ट्रप्रेमाचा उद्गार व्यक्त करण्यात आला. सहभागी प्रत्येकाच्या हातात तिरंगा झळकत होता.

या रॅलीस कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर योमिका सिंग यांच्यासह भारतीय लष्कराच्या समस्त जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

रॅलीदरम्यान सै. अयाज अली नियाज अली, खालीद बागवान, एस. डी. वाणी, हाजी शकुर बादशाह, मनोज सेठिया, योगेश मराठे, हाजी इकबाल चाँद, नितीन शिंपी, रईस शेख, अमान बिलाल, कामिल खान, शफी ठेकेदार, सलमान मेहबूब, झिशान हुसैन, अमोल वाणी, यासिर अली, अयान नवाब, मोईन अली, हाजी सलीमुद्दीन, असलम खान, नागोरी, वहाब बागवान, ओवेश अली, नासिर बागवान आदींसह अनेक देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button