जळगावशैक्षणिकसामाजिक

तायक्वांदो,मुंबईचे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

तायक्वांदो,मुंबईचे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

जळगांव प्रतिनिधि

इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र , मुंबई संघटनेचे २४ खेळाडू महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार असल्याचे ‘ताम‘ राज्य संघटनेचे महासचिवमिलिंद पठारे यांनी सांगितले.

३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२५ आज दिनांक २८ जानेवारी १४ फेब्रुवारी या कालावधित उत्तराखंड येथे रंगणार असून ३२ विविध क्रीडा प्रकारांत देशभरातील खेळाडू कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ ९०० पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहेत. गतवर्षीच्या गोवा येथे झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला महाराष्ट्राचा संघ यंदाही गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.

तायक्वांडो या क्रीडा प्रकारात गतवर्षी क्युरोगी आणि पुमसे प्रकारात तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र ( मुंबई ) संघाच्या खेळाडूंनी अनेक पदके पटकावली होती. यावेळी सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव श्री मिलिंद पठारे सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, निरज बोरसे, दुलिचदं मेश्राम सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर आदिनीं व्यक्त केली आहे .

महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले क्युरोगी खेळाडू पुढीलप्रमाणे पुरुष – ५४ किलो – अभिजित खोपडे ,५८ किलो – आयुष ओहल , ६३ किलो – शिवम शेट्टी , ६८ किलो – करण मंदाडे ,७४ किलो – पुष्पक महाजन , ८७ किलो वरील – गौरव भट , ८७ किलो आतील – अभिजित सुकाले ( वाईड कार्ड एन्ट्री ) यांची निवड झाली आहे तर

* महिला गटात ४६ किलो आतील – साक्षी पाटील ,४९ किलो आतील – नयन बारगजे, ५३ किलो आतील – श्रुतिका टकले , ५७ किलो आतील – शिवानी भिलारे, ६२ किलो आतील – भारती मोरे, ६२ किलो आतील ( वाईड कार्ड एन्ट्री ) मनिषा गुट्टेदार ,६७ किलो आतील – सिद्धी बेडांळे , ७३ किलो आतील – अनामिका डेके , श्रावणी दांगट ( वाईड कार्ड एन्ट्री ), ७३ किलो वरील – श्रेया जाधव यांची निवड झाली आहे.

* पुमसे पुरुष खेळाडू – वंश ठाकुर व शिवम भोसले ( वैयक्तिक प्रकार ) तर पुमसे महिला खेळाडू – राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती वसुंधरा छेडे , शिवम भोसले ( पेअर ) , मृणाली हर्णेकर व वंश ठाकुर ( पेअर ) , मृणाली हर्णेकर , वसुंधरा छेडे , व गृप प्रकारात गौरी हिंगणे , पागिणी शर्मा व धारा धनक या खेळाडूंची तर प्रशिक्षकपदी प्रविण बोरसे , प्रविण सोनकुल , अमोल तोडनकर , रॅाबीन मेंजीस , अजित घारगे, प्रमोद कदम यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
डॉ. अविनाश बारगजे (अध्यक्ष) ,मिलींद पठारे (महासचिव), व्यंकटेश कररा (कोषाध्यक्ष) ,निरज बोरसे , दुलीचंद मेश्राम , प्रविण बोरसे ( उपाध्यक्ष) , सुभाष पाटील ( सहसचिव), अजित घारगे , सतिष खेमसकर ( सदस्य) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ,मुंबई यांनी सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button