आर्थिक कारणावरून शेतकऱ्याने संपविले जीवन

आर्थिक कारणावरून शेतकऱ्याने संपविले जीवन
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील घटना
पाचोरा प्रतिनिधी आर्थिक कारणावरून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील अंतुर्ली येथे उघडकीस आली असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुरषोत्तम सदाशिव पाटील (वय- ४५ वर्ष) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सूत्रांची दिलेलुआ माहितीनुसार अंतुर्ली खुर्द प्र. पा. येथील रहिवाशी पुरषोत्तम सदाशिव पाटील (वय- ४५ वर्ष) यांच्या मालकीचे एक एकर शेत आहे. या शेतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
६ फेब्रुवारी रोजी पुरषोत्तम पाटील हे शेतात गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला असता त्यांचे शेतात झाडाला पुरषोत्तम पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पुरुषोत्तम पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पुरषोत्तम पाटील यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या मयत त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगा असा परिवार आहे. घतपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.