
पैशांच्या वादातून तरुणाला दोघांकडून बेदम मारहाण
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात पैशाच्या वादातून एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना घडली. पीडित तरुण अकबर सत्तार कुरेशी (वय ४२, रा. हरिविठ्ठल नगर) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवार, १९ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. अकबर कुरेशी हे जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील जुना बाजार पट्टा परिसरात वास्तव्यास असून, त्यांचा काही जणांशी आर्थिक व्यवहार सुरू होता. त्याच दरम्यान, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले आणि पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनी मिळून कुरेशी यांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार जितेंद्र राठोड पुढील तपास करीत आहेत