
दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चोऱ्या करणाऱ्या दोन टोळींना अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी
दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन टोळींना पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणि महालक्ष्मी पुणी एक्झिम या कंपनीमध्ये दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. यात साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतून तीन लाख तीन हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व अल्युमिनियमच्या वायरिंग, इलेक्ट्रिक मोटर फिट कंट्रोलर पॅनल लोखंडी पॅनल लोखंडी बीम रोल दोन गेअर बॉक्स ट्रांसफार्मर प्लास्टिकच्या 30 भरलेल्या वर्जिनच्या दाण्याच्या बॅगा असा मुद्देमाल चोरी गेला होता, त्यानुसार या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या पथकाने साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत, रा सुप्रीम कॉलनी जळगाव, आकाश सुरेश शिंदे रा साईनगर कुसुंबा आणि पृथ्वीराज उर्फ बऱ्या बच्चन बागडे यांना त्यांच्या राहत्या घरातून 9 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 11 हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोका योगेश घुगे करीत आहे. तसेच दुसऱ्या घटनेत एन 98 सेक्टर मधील महालक्ष्मी युनि एक्झिम या कंपनीत चोरी करणाऱ्या संशयित प्रकाश उर्फ गिड्डा राठोड गोविंदा उर्फ लंबा देविदास ढालवाले दोन्ही राहणार सुप्रीम कॉलनी यांना 10 फेब्रुवारी रोजी गणेशोत्पथकातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 35 हजार रुपयांपैकी 22 हजार रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्या फरार असलेल्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे चंद्रकांत धनके योगेश बारी किशोर पाटील सिद्धेश्वर दापकर छगन तायडे किरण पाटील नितीन ठाकूर योगेश घुगे आदींनी कारवाई केली.