जळगावराजकारणशासकीयसामाजिक

भुसावळ : धक्कादायक निकाल! गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी

भुसावळ : धक्कादायक निकाल! गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी

मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताईंचा पराभव

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजय मिळवला. भाजपाच्या उमेदवार तथा मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई सावकारे यांचा अवघ्या ६२७ मतांनी पराभव झाला.

नगराध्यक्षपद एससी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपाने रजनीताई सावकारे यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत विरोधकांची एकजूट न झाल्याने लढत बहुरंगी झाली. काँग्रेसकडून सवीता सुरवाडे, फायरब्रँड नेते जगनभाई सोनवणे यांच्या पत्नी पुष्पाताई सोनवणे तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) चा उमेदवारही रिंगणात होता.

प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे, गिरीश महाजन यांनी भाजपासाठी सभा घेतल्या, तर विरोधकांकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रचार गाजवला. प्रचाराची सूत्रे मात्र संतोष चौधरी व अनिल चौधरी बंधूंच्या हाती होती.

२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला रजनीताईंनी १० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या फेऱ्यांत गायत्री भंगाळे यांनी जोरदार मुसंडी मारत कमबॅक केले. अटीतटीच्या लढतीअंतर्गत त्यांनी ६२७ मतांनी विजय मिळवला.
या अनपेक्षित पराभवाने मंत्री संजय सावकारे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी नऊ वर्षांनंतर जोरदार कमबॅक केले असून, भुसावळच्या राजकारणाची आगामी दिशा बदलणारा हा निकाल ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

प्रभाग ४ अ मधून नंदा नरेंद्र संदानशिव (शहर विकास आघाडी) यांनी विजय मिळवला, तर ४ ब मध्ये शिवसेनेचे शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन निवडून आले. प्रभाग ५ अ मधून शिवसेनेचे श्रीराम भगवान चौधरी, तर ५ ब मधून अपक्ष परदेशी कल्पना भरतसिंग यांनी विजय संपादन केला. प्रभाग ६ अ मध्ये अपक्ष सविता योगराज संदानशिव आणि ६ ब मध्ये अपक्ष चौगुले दीपक हरी विजयी झाले.
प्रभाग ७ अ मधून अपक्ष योगिता सयाजीराव कापडणेकर, तर ७ ब मधून अपक्ष पाटील प्रवीण गंगाराम यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. प्रभाग ८ अ मध्ये शहर विकास आघाडीचे पाटील सचिन बळवंत हे बिनविरोध निवडून आले, तर ८ ब मध्ये शिवसेनेच्या अपूर्वा जालिंदर चौधरी यांनी विजय मिळवला.

प्रभाग ९ अ मधून शिवसेनेच्या शर्मा कल्पना चंद्रकांत, तर ९ ब मधून शिवसेनेचे चौधरी पंकज पंडित विजयी झाले. प्रभाग १० अ मध्ये शहर विकास आघाडीचे सचिन विभाकर कासार, तर १० ब मध्ये अपक्ष स्वाती सूरजसिंग परदेशी निवडून आल्या. प्रभाग ११ अ मधून अपक्ष पाटील छाया बाळू यांनी विजय मिळवला, तर ११ ब मध्ये शहर विकास आघाडीचे विजय कहारू पाटील विजयी झाले. प्रभाग १२ अ मधून शिवसेनेच्या पुष्पा पंकज भोई, तर १२ ब मधून शिवसेनेचे धनगर सुयोग ज्ञानेश्वर यांनी यश मिळवले.
एकूण निकालानुसार शहर विकास आघाडी – ८, शिवसेना – ७ आणि अपक्ष – ८ असे संख्याबळ स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदासाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. निकाल जाहीर होताच शहरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button