
रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक
मध्य रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची संयुक्त कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) – धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश करत मध्य रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईत सहा जणांना अटक केली आहे. अटकेतील एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ही कारवाई शनिवारी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला असलेल्या मुसाफिरखाना परिसरात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – गिरिजाशंकर बाबूलाल शर्मा (७१, रा. नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (५९), रवी लक्ष्मीनारायण बागरी (२५, रा. उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (३५), महेंद्र देवकरण यादव (२२, रा. देवास), राजू निंबा खैरनार (६०, रा. नाशिक). अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असूनया आरोपींनी हावडा – सीएसएमटी मेल एक्सप्रेसच्या एसी डब्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे गिरिजाशंकर शर्मा हा याआधी अनेक वेळा गुन्ह्यात अडकलेला असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
विनोद बागरी आणि महेंद्र यादव यांनी ट्रेन क्रमांक ११०५७ (सीएसएमटी – अमृतसर एक्सप्रेस) च्या बी-३ कोचमधून १५ हजार रुपये रोख रकमेची बॅग चोरल्याची कबुली दिली आहे. एक आरोपीवर चॅप्टर केस दाखल असल्याचेही समोर आले आहे.
ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय शिवानंद गीते यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक – हेकॉं. महेंद्र कुशवाहा, जोगेंद्र नेरपगार, कॉ. बाबू मिर्झा, आणि लोहमार्ग पोलिसांचे हेकॉं. विशाल चौधरी यांनी संयुक्तरित्या केली.