Breaking : खासदार स्मिता वाघ यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर

Breaking : खासदार स्मिता वाघ यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर
जळगाव मीडिया | १८ मे २०२५
संसदेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार २०२५ यंदा जाहीर झाला असून, महाराष्ट्राने यामध्ये बाजी मारली आहे. राज्यातील सात खासदारांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदा ज्या महाराष्ट्रातील खासदारांची निवड झाली आहे, त्यात पुढील नावे आहेत:
• सुप्रिया सुळे
• श्रीरंग बारणे
• अरविंद सावंत
• नरेश म्हस्के
• स्मिता वाघ
• मेधा कुलकर्णी
• वर्षा गायकवाड
तसेच इतर देशपातळीवरील नेत्यांमध्ये भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवर आधारित असून, प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिले जातात. संसदेत उपस्थिती, प्रश्न विचारणे, चर्चा आणि विधेयक मांडणे यावरून खासदारांची कामगिरी तपासून हे पुरस्कार जाहीर केले जातात.