सार्वजनिक जागेवर गांजा ओढणाऱ्या दोघांवर कारवाई
जळगाव प्रतिनिधी
शहरातील मेहरूण टाळा परिसरात उद्यानामध्ये दोन जण चिलीम मध्ये अमली पदार्थ असलेला गांजा ओढतांना ३० जानेवारी रोजी आढळून आले असून एलसीबीच्या पथकाने दोन जणांना तब्यत घेऊन एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मेहरूण परिसरातील उद्यानांत मेहमूद शेख इस्माईल शेख वय-५८, रा.गेंदालाल मिल, जळगाव आणि रऊफ सत्तार बागवान वय-६०, रा.तांबापुरा दोघे नीलांमध्ये गांजा पितांना आढळून आले .त्यांच्याकडून गांजा आणि इतर साहित्य जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिलाल पाटील आणि विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहे.