जळगाव प्रतिनिधी I :- जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांपासून झालेल्या अपघातात निष्पाप व्यक्तींचा बळी जात असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव शहरातील वाहतूक मार्ग आणि वेळेत बदल करून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन-टॉवर चौक – नेरी-नाका चौक, अजिंठा चौक तसेच नेरी-नाका ते स्वातंत्र्य चौक पावेतो जाणारे रस्त्यांवर, जाण्यास व येण्यास, सर्व प्रकारच्या खाजगी / लक्झरी बसेस व अवजड वाहनांना (राज्य परिवहन मंडळ बसेस वगळून) सदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
अवजड वाहने (मालवाहतूक करणारी) शहरात अजिंठा चौक-नेरी नाका-टॉवर चौक-शिवाजीनगर उड्डाणपूल या मार्गाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीतच मालवाहतूक करता येणार आहे. ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्यापर्यंत उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्ती/ संस्थेकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना असतील त्यांनी त्या सूचना मुदत संपण्यापूर्वी सादर केल्यास त्यावर पोलीस अधीक्षक, जळगाव विचार करतील.