जळगावधार्मिकसामाजिक

जळगावात मकर संक्रांतीच्या शुभप्रसंगी आचार्य किरीट भाईजींचे भव्य प्रवचन

जळगाव (प्रतिनिधी – जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्य गृह येथे मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे भव्य प्रवचन आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात मा. किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभावाना होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात संत मा. किरीट भाईजी यांची जागतिक कीर्ती पसरली आहे. त्यांनी देश विदेशात श्रीमद्भागवत, शिवपुराण, राम कथा, हनुमान कथा इत्यादी अध्यात्मिक विषयांवर निरूपण केलेले आहे अशा महान संतांचा लाभ भाविकांना होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती द्यावी … असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button