
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
बॅरीस्टर निकमांचा वारसा यशस्वी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.
बिनविरोध निवडणूक होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन,पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील,वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे,पदमश्री ॲड.उज्वल निकम,
रोहित निकम यांचे वडील दिलीपराव निकम यांनी देखील सहकारात वर्चस्व सिध्द केले होते.आई शैलेजा देवी निकम या जिल्हा बॅंकेच्या संचालिका असुन सहकारातील केंद्र व राज्याची अनेक पदे त्यांनी भूषविले आहे. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाल्याने विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे रोहित निकम,संजीव मुकुंदराव पाटील,रमेश जगन्नाथ पाटील,यादवराव विष्णू पाटील,रामनाथ चिंधु पाटील,सुधाकर दौलतराव पाटील,मंगेश भरत पाटील,शांताराम चंद्रा सोनवणे,श्वेतांबरी रोहित निकम,सोनल संजय पवार,अरूण बाबुराव देशमुख,गजानन मल्हारराव देशमुख,प्रशांत लिलाधर चौधरी,विवेक राजाराम पाटील,अरविंद भगवान देशमुख,निळकंठ आनंदा नारखेडे,पुंडलीक दौलत पाटील,प्रताप हरी पाटील,अरूण आत्माराम पाटील यांची निवड झाली आहे.