जळगावसामाजिक

केमिस्ट संघटनेकडून जिल्हाभरातुन ३५०० युनिट रक्त संकलनाचा संकल्प – सुनील भंगाळे

केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदेच्या ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

केमिस्ट संघटनेकडून जिल्हाभरातुन ३५०० युनिट रक्त संकलनाचा संकल्प – सुनील भंगाळे

केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदेच्या ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

जळगांव ;- अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे (AIOCD) अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे (MSCDA) अध्यक्ष मा. आ. जगननाथ शिंदे यांच्या २९ जानेवारी २०२५ रोजी ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधुन केमिस्ट साठी अहोरात्र झटणारे आ. आप्पासाहेब यांचा हा अमृत महोत्सवी जन्मदिवस संपूर्ण देशभरात रक्तदानाच्या पवित्र कार्याने साजरा करण्याच्या संकल्प संघटनेने घेतला आहे कैमिस्ट हृदय सम्राट जगनाथजी शिंदे ह्यांचा नेतृत्वाखाती बदतेता केमिस्ट समाजासाठी या निमित्ताने काही तरी देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तदान करण्याचा संकल्पातून हे साध्य करण्याचा प्रयन ह्या रक्तदान कार्यक्रमातून केला जात आहे.

रक्तदान हे जीवनदान आहे रक्ताच्या थेंबांनी कोणचा तरी आयुष्य वाचू शकतो या जीवनदायी उपक्रमाने केमिस्ट समाजाचे देणे लागतो या सामाजिक ऋण फेडण्याच्या विचारातून समाजसेवेसाठी रक्त दान करून समर्पित होणार आहे. ह्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर भव्य स्वरूपातील रक्तदान शिबिराचे आयोजन एकाच दिवशी म्हणजे २४ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले असून संपुर्ण राज्यभरातून एकाच दिवसात ७०५हजार पेक्षा जास्त संख्येने रक्तदाते उत्स्फुर्त होऊन समर्पण भावनेने रक्तदान करणार अशी अपेक्षा आहे.

जळगाव जिल्ह्याने देखील या समर्पित भावनेची प्रेराणा घेऊन जिल्हा अध्यक्ष  केमिस्ट भुषण . सुनील भंगाळे ह्यांचा नेतृत्वाखाली व सचिव अनिल भाऊ झवर ह्यांचा मार्गदर्शनाखाली संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ह्या संकल्पाची पूर्ती केली जाणार आहे व त्यातुन जिल्ह्याभरातून प्रत्येक केमिस्ट या पवित्र कार्यात सहभाग नोंदवणार आहे. प्रत्येक तालुक्यातील, गावातील, सर्व केमिस्ट आपल्या जिल्ह्यातुन ३५०० युनिट (बॉटल) संकलित करणार आहे व या हाती घेतलेल्या संकलपाची पूर्ती करतील याचा विश्वास जिल्हा संघटनेला असुन त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुकण्याचा ठिकाणी या भव्य रक्तदान शिबीर आयोजनाची तयारी पूर्णत्त्वाला देली आहे.

जळगांव शहरात केमिस्ट भवन, श्री साई मेहरूण, कॉलेज ऑफ फार्मसी, पतोड हॉल राधाकिसनवाडी ह्या ठिकाणी रक्तदानासाठी नियोजन करण्यात आले असुन भुसावळ येथे धन्वंतरी ब्लड बैंक हॉल, आनंद नगर पाचोरा येथे एम. एम. कॉलेज हॉल, जामनेर येथे साई पुष्प हॉस्पिटल, बोदवड येथे डॉ. विशाल चौधरी हॉस्पिटल रावेर येथे महाजन हॉस्पिटल, अमळनेर फार्मसी कॉलेज, चोपडा युनियन रेडक्रॉस हॉल, पारोळा येथे केमिस्ट भवन, भडगांव शिवसेना कार्यलय चाळीसगांव येथे अरिहंत मंगल कार्यलय, एरंडोल येथे आई हॉस्पिटल, धरणगांव येथे वाणी मंगल कार्यालय या ठिकाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा संघटनेच्या माध्यमातुन तालुका संघटनानी केले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी,  सुनित भंगाळे ह्यांच्या नेतृत्वाखाली सचिव अनिल झवर, खजिनदार शामकांत वाणी, ब्रेजेश जैन, दिनेश मालू, स्वप्नील रहे, संदीप बेदमुधा, श्रीकांत पाटील, खालिद शेख, संजय तिवारी, कनमाल राका, नरेश मंधान, योगेश भोकरे, अतुल अग्रवाल, सुरेश भंडारी, गोविंद महाजन, पंढरीनाथ पाटील, प्रशांत पाटील, दीपक पाटील, शरद वाणी, सुधाकर वाणी, मनीष पाटील, राजेंद्र भोसले, साहेबराव भोई, समीर गुळवे, तिलक फालक, असे सर्व कार्यकारणी सदस्य व तालुका कार्यकारणी सदस्य व इतर केमिस्ट बांधव या भव्य रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे तसेच दिनांक २४ जानेवारी रोजी संपुर्ण जिल्ह्याभरत आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमास मोठ्या संख्येने केमिस्ट बांधवानी आपल्या मित्रपरिवासह सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जिल्ह्या अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनिल झवर ह्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button