गुन्हेजळगाव

अनैतिक संबंधांच्या कारणावरून तरुणाची हत्या; चार जणांना अटक 

अनैतिक संबंधांच्या कारणावरून तरुणाची हत्या; चार जणांना अटक 

एलसीबीच्या पथकाची 24 तासांच्या आत कारवाई

जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील ए वन भरीत सेंटरजवळ शनिवारी (दि. ३ मे) रात्री आकाश पंडित भावसार (वय २७, रा. अशोक नगर) या तरुणाची अनैतिक संबंधांच्या कारणावरून धारदार शस्त्रांनी वार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या २४ तासांत चार संशयितांना अटक करत तपासात मोठे यश मिळवले आहे. मात्र, मुख्य संशयित अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत.आकाश यांच्या आई कोकिळाबाई भावसार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अजय मंगेश मोरे (वय २८, रा. कासमवाडी) याच्यासह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

एलसीबी आणि शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्तचर यंत्रणेच्या साहाय्याने तपासाला गती देत अजय मोरे याच्यासह तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. हे आरोपी मित्र आणि नातेवाइकांकडे लपले होते.पोलिस तपासात कुणाल उर्फ सोनू चौधरी हा मुख्य संशयित असल्याचे समोर आले असून, तो सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे.शहरात सलग घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button