
कोलते-पाटील डेव्हलपर्स : एक यशोगाथा, स्वप्नपूर्तीची वास्तू!
पुणे | प्रतिनिधी
कोलते-पाटील डेव्हलपर्स ही केवळ एक रिअल इस्टेट कंपनी नाही, तर हजारो कुटुंबांच्या स्वप्नांचं घर आहे. विश्वास, गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या या कंपनीच्या प्रकल्पांनी पुण्याच्या शहरी जीवनशैलीला नवी व्याख्या दिली आहे.
या यशस्वी वाटचालीचा प्रारंभ १९७० मध्ये जळगावमध्ये अनिरुद्ध पाटील यांच्या धाडसी पावलाने झाला. त्यांची दूरदृष्टी आणि प्रयत्न त्यांच्या मुलांनी – राजेश पाटील (आजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) आणि नरेश पाटील (उपाध्यक्ष) – पुढे नेले. १९८९ मध्ये पुण्यात विस्तार झालेल्या व्यवसायाने १९९१ मध्ये ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ या खासगी कंपनीचा आकार घेतला. पुढे ही कंपनी सार्वजनिक झाली आणि २००७ मध्ये NSE व BSE वर सूचीबद्ध होऊन रिअल इस्टेट क्षेत्रात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली.
आज या कंपनीची मार्केट व्हॅल्यू ₹4088 कोटींवर पोहोचली आहे.
पुणे, मुंबई, बंगळूरू यांसारख्या महानगरांमध्ये त्यांनी आलिशान निवासी, व्यावसायिक आणि आयटी प्रकल्प उभारले असून आजवर २० दशलक्ष चौरस फूटांहून अधिक बांधकाम पूर्ण केलं आहे.
त्यांचा ‘लाईफ रिपब्लिक हिंजवडी’ हा ४०० एकरमधील एकात्मिक टाउनशिप हा भविष्यातील शहराचा आराखडा आहे. तसेच ‘लिटिल अर्थ’, ‘स्प्रिंगशायर’, ‘थ्री ज्वेल्स’, आणि 24K Altura, Stargaze, Opula यांसारख्या प्रकल्पांनी त्यांनी प्रीमियम सेगमेंटमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
“केवळ बांधकाम नाही, तर निर्मिती” या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणारी ही कंपनी आजही CRISIL चं ‘AA-/Stable’ रेटिंग मिळवणारी एकमेव सूचीबद्ध रेसिडेन्शियल रिअल इस्टेट कंपनी आहे – जी त्यांच्या पारदर्शकतेची आणि आर्थिक स्थैर्याची साक्ष देते.
एका मराठी कुटुंबाच्या दूरदृष्टी, गुणवत्ता आणि मेहनतीवर उभारलेलं हे साम्राज्य आज लाखो लोकांच्या आयुष्याचं आधारवड ठरत आहे.