धार्मिकराष्ट्रीय

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने महा कुंभमेळ्यात घेतला संन्यास

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने महा कुंभमेळ्यात घेतला संन्यास

प्रयागराज वृत्तसंस्था

ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ममता कुलकर्णीला आजपासून श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले.

विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने स्वत: इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या रुपात पाहायला मिळत आहे. मी आज कुंभमेळ्यात जाणार आहे. येत्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येला शाही स्नान करुन मी विश्वनाथ मंदिरात जाईन. यानंतर मी अयोध्येत जाऊन तिथे पिंडदान करेन, अशी माहिती ममता कुलकर्णीने दिली आहे. दरम्यान ममता कुलकर्णीचे साध्वी बनल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या पोस्टवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

ममता विषयी बोलायचे झाले तर 1992 मध्ये आलेल्या तिरंगा या सुपरहिट चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ममता कुलकर्णीने जवळपास 40 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है आणि क्रांतिवीर यांसारख्या मोठ्या चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 2001 मध्ये रिलीज झालेला छुपा रुस्तम हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने मनोरंजन उद्योगाला अलविदा केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button