जळगाव : बांधकाम साइटवरील एका खोलीमध्ये मोबाईल लांबवणार्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
रणजीतकुमारसहदेव रॉय (वय ३३, रा. बिहार, ह. मु. खेडीशिवार) यांच्या खोलीचा दरवाजा उघडून विजय श्रीराम बारेला (वय २४, रा. धुरकुट, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याने मोबाईल चोरुन नेला.
ही घटना दि. ६ जानेवारी रोजी घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर रॉय यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी गुनहा दाखल करण्यात आला असून संशयित विजय बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.