क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सत्कार

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे 120 गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सत्कार
सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन केला गौरव
जळगाव (प्रतिनिधी): क्षितिज युवा फाउंडेशनच्या वतीने श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दहावी, बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात १२० विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
समारंभात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ होत्या. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सदाशिवराव ढेकडे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, भाजपा मंडल अध्यक्ष विनोद मराठे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, जी. जे. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक सुरेशसिंग राजपूत, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर नाईक, माजी सैनिक किशोर ढाकणे, परीट धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश ठाकरे, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी, सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ, राजेंद्र पाटील, दीपक बाविस्कर, राहुल लष्करे, सचिन घुगे, अक्षय सांगळे, आसिफ शाह बापू आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात समाजकार्याबद्दल उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रमेश विठ्ठल चाटे, बाबुराव रामदास वाघ आणि नारायण तुकाराम वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मृत्यूनंतर अंतिम संस्कारासाठी आवश्यक तयारी, विधी व परंपरांचे पालन करून निस्वार्थ सेवा देणाऱ्या या कार्यकर्त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षितिज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी, राहुल सानप, नितीन वंजारी, मिलिंद तायडे, धिरज नाईक, लोकेश वाघ, पंकज तायडे, प्रणव वंजारी, मनोजकुमार पाटील, निखिल मासुळे, भावेश पाटील, सागर तायडे, विशाल वंजारी, हर्षल वाघ यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन विनोद मराठे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन वंजारी यांनी केले.