जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या शिवसेना उमेदवारांचा इच्छापूर्ती श्री गणेशाला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या शिवसेना उमेदवारांचा इच्छापूर्ती श्री गणेशाला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ
जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाच मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सकाळी विसनजी नगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरातून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रभाग क्रमांक पाच अ चे महायुतीचे शिवसेना उमेदवार विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, श्याम कोगटा, यांच्या सह प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
सोमवारी सकाळी दहा वाजेपासून महायुतीच्या शिवसेना उमेदवारांनी प्रभागात पदयात्रा काढली. या पदयात्रेत ठिकठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. ठीक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे भव्य स्वागत केले. याप्रसंगी नागरिकांनी शिवसेना उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन दिले.




