
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमझानला आजपासून सुरुवात
उद्यापासून होणार पहिल रोजा
जळगाव प्रतिनिधी
मुस्लीम बांधवांचा पवित्र, महत्वपूर्ण रमझान चा आज सायंकाळी स्पष्टपणे चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून रमझान महिन्याची सुरवात झालेली असून आज पासून रमझान ची विशेष नमाज (फक्त रमझान महिन्यात पठण केली जाणारी विशेष प्रार्थना ) नमाज ए तरावीह अदा (पठण ) ला सुरवात होईल. तसेच उद्या सकाळी प्रथम सहेरी (अल्पोहार ) करून पहिल्या रोझा ची सुरवात होईल.
असे आवाहन सुन्नी जामा मस्जिद व सुन्नी रूयते हिलाल कमिटी जळगांव तर्फे सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा, मौलाना नजमूल हक, इकबाल वझीर, रशीद कुरेशी, सय्यद जावेद, मुख्तार शाह, अफझल मनियार यांनी केले आहे.