जळगावराजकारण

शहरातील प्रत्येक गल्लीत आणेल विकासगंगा ; डॉ.अश्विन सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास !

जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जोरदार प्रचार सुरु असून शहरातील पिंप्राळा हुडको, दुध फेडरेशन, नविन पिंप्राळा, ख्वाजा नगरी, सिद्धार्थ नगर, भुमी नगर, सोनी नगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य लाडक्या बहिणींनी डॉ.अश्विन सोनवणे यांचे औक्षण करून परिसरातील विविध समस्या मांडल्या.

गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “शहराला हवा चेहरा नवा, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत. शहराच्या विविध परिसरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवी चैतन्याची लहर दिसून आली.
या परिसरातील काही नागरिकांनी परिसरात असलेल्या विविध समस्या डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे मांडल्या यावेळी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरात आगामी काळात प्रत्येक गल्लीत विकासाची गंगा आणेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button