
गोदावरी महाविद्यालयाच्या वाहनावर माथेफिरुकडून दगडफेक
जळगाव : गोदावरी फाऊंडेशन संचलीत महाविद्यालयाच्या वाहनावर रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने दगडफेक करून झायलो कारचे नुकसान करण्याची घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी फाऊंडेशन संचलित महाविद्यालय आहे. रविवारी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास महाविद्यालयावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यात महाविद्यालयाच्या (एमएच १९ बीयू ७००५) क्रमांकाच्या वाहनाच्या काचेची तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी महाविद्यालयाचे कर्मचारी मयूर हेमराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात माथेफिरूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे