नवी दिल्ली वृत्त संस्था:-चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो वायरस HMPV ची वेगाने लागण होत असून या विषाणू ने आधीच चीनमध्ये कर माजवला आहे . भारतामध्येही याचा पहिल्या रुग्ण कर्नाटकातील बंगळुरू येथे आढळला असून आठ महिन्याच्या चिमुकलीला याची लागण झाली आहे. दरम्यान रुग्ण आढळून आल्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले आहे.
बंगळुरूमध्ये HMPV चा पहिला रुग्ण आढळला असून एका आठ महिन्यांच्या बाळाला याची लागण झाली आहे. बंगळुरूच्या खासगी रुग्णालयात याबाबत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये या लहानगीला HMPV चं संक्रमण झाल्याचं समोर आलं. खाजगी रुग्णालयाने याबाबत चाचणी केली आहे. सरकारी रूग्णालयानं अद्याप याची टेस्ट केली नसल्याचं बंगळुरू आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
या नव्या व्हायरसची लक्षणंही जवळपास कोरोनासारखीच आहे. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा श्वसनासंबंधित इतर कोणत्याही व्हायरसप्रमाणे आहे. या व्हायरसमध्ये सर्दी, खोकला सारखी सामान्य फ्लूची लक्षणं आढळतात.