
जळगाव मीडिया प्रतिनिधी – शहरातील शनिपेठ काट्याफाईल परिसरातील रहिवासी असलेले मिल्लत हायस्कूलचे माजी प्राचार्य, जमाते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक सर मिर्जा वय-६२ यांचे सोमवार दि.१३ रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुश्ताक सर यांच्या पश्चात ४ भाऊ, २ बहिणी, आई, पत्नी, २ मुली, १ मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते अश्फाक मिर्जा यांचे भाऊ होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवार दि.१४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मिर्झा चौक, काट्याफाईल राहत्या घरून निघणार असून ईदगाह कब्रस्तान या ठिकाणी दफनविधी होणार आहे.
शोकाकूल
अश्फाक मिर्जा – मो.9860669999