ब्रेकिंग न्यूज़ जळगाव शहरातील कासमवाडीत तरुणाचा खून!

जळगाव मीडिया प्रतिनिधी । वसीम खान । जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर दोघांनी धारदार कोयत्याने वार केल्याची घटना आज रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील वय-२७ असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासमवाडी परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील या तरुणाचे आपल्याच ओळखीतील एका तरुणाशी किरकोळ वाद होते. दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास नाना घराजवळील एकता मित्र मंडळकडे उभा होता.
जुन्या वादातून दोन तरुण त्याठिकाणी आले आणि त्यांनी त्याच्याशी वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारी झाल्याने दोघांनी धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केले. इतर मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारा दरम्यान ज्ञानेश्वर याचा मृत्युव झाला
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे.