
चोपड्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; एकाला अटक
चोपडा : – एका अल्पवयीन मुलीच्या घरामध्ये दूत तिला कैचीचा धाक दाखवून विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
शहरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी भूषण मनोरे (वय ३०) याने दि. २९ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या
घरात घुसून शैक्षणिक नुकसानीचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला. मुलीची आई परत आल्यावर तिला घडलेली घटना सांगितली. मुलीच्या आईने दि. ३० रोजी चोपडा शहर पो.स्टे.ला सदर आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी भूषण मनोरे याच्याविरुद्ध ३३४, ७४, ७५, ११५, पोक्सो कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे