जळगावशैक्षणिक

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांना सेवापूर्तीनिमित्त भावपूर्ण निरोप

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांना सेवापूर्तीनिमित्त भावपूर्ण निरोप
​जळगाव: येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप हे शुक्रवारी (दि. ३१ जुलै २०२६) आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना संस्था व शाळेतर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्कारमूर्ती प्रशांत जगताप, सारिका जगताप, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि रमा तारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.

​यानंतर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप व सारिका जगताप यांचा शाळेतर्फे व संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थेचे विश्वस्त प्रेमचंदजी ओसवाल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
​या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, ज्येष्ठ संचालक प्रा. शरच्चंद्र छापेकर, सहसचिव मिराताई गाडगीळ, मुख्य समन्वयिका पद्मजा अत्रे, संचालक ॲड. पंकजदादा अत्रे, प्रिया देशपांडे आणि मंगलाताई दुनाखे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग. स. पतपेढीच्या अध्यक्षा रागिणी चव्हाण व संचालक मंडळातर्फेही त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

​या सोहळ्याला प्रशांत जगताप यांच्या मातोश्री, कन्या, जावई, मुलगा, बहिणी, मेहुणे, भाऊ आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. शाळेतील सेवानिवृत्त तसेच विद्यमान शिक्षकांनीही त्यांचा वैयक्तिक सत्कार केला.
​मनोगत व्यक्त करताना शिक्षक जगदीश साळुंखे, सोमनाथ महाजन, आनंदा चौधरी, आनंद पाटील, नितीन कोष्टी, संपदा तुंबळे, सुरेश कुलकर्णी, श्रीकांत घुगे, सुभाष पाटील, श्रुती जगताप, अनिल पाटील व पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी जगताप सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव केला. त्यांचा शांत स्वभाव, उत्तम नियोजन, अभ्यासू वृत्ती, आदर्श क्रीडा मार्गदर्शक, उपक्रमशीलता आणि कल्पकता या गुणांचा वक्त्यांनी विशेष उल्लेख केला.

​सत्कारमूर्ती उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी आपल्या उत्तरार्धाच्या मनोगतात संस्था, शाळा, सहकारी आणि कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सेवानिवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहण्याचा मानस त्यांनी बोलवून दाखवला.

​कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी जगताप सरांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांना सुखी, समृद्ध आणि निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पाटील यांनी केले, तर आभार वृषाली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button