सामाजिक

छत्रपती शाहू महाराज रुग्णालय परिसरात वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी घेतला हिरवाईचा संकल्प

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या वतीने शाहूनगर परिसरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक ६ मध्ये आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि शहरात अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमास जळगाव मनपा शिवसेना गटनेते अर्शीन शोएब खाटिक, नगरसेवक दीपक भाऊ सूर्यवंशी, सौ. सुचिता ताई हाडा, समाजसेवक शोएब खाटिक, महानगरपालिकेचे अतिक्रमण अधीक्षक श्री. संजय ठाकूर आणि श्री. प्रमोद भाऊ वाणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सौ. डॉ. लीना अनुज पाटील, नारायण पाटील, शेखर ठाकूर, धीरज शेटे, शोएब खाटीक यांच्यासह छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांची नियमित देखभाल करण्याचे आवाहनही करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमामुळे रुग्णालय परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होणार असून, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह नागरिकांना स्वच्छ व प्रसन्न वातावरण मिळण्यास हातभार लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button