अमळनेर शहराचा लचका तोडणारा नगराध्यक्ष नको – माजी आमदार शिरीष चौधरी
२४ तास शहर विकास आघाडीच्या उमेदवाराने केलेले उद्योग अमळनेरकरांना ठाऊक आहेत म्हणुनच स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकता आणि सेवाभाव, उच्चशिक्षित, सामाजिक बांधलकी जपणाऱ्या डॉ. परीक्षीत बाविस्कर यांनाच अमळनेरकर जनता संधी देणार.

जळगाव मीडिया अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर ही संतांची भूमी-पावित्र्य, साधेपणा आणि प्रामाणिकतेची परंपरा जपणारी. या भूमीच्या सेवेसाठी चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वच आवश्यक आहे. ही गुणवत्ता डॉ. परीक्षीत बाविस्कर यांच्यात पक्की आहे.
डॉ. बाविस्कर हे १५ नंबर प्रभागचे रहिवासी, मुळचे अमळनेरकर. जळगावला वैद्यकीय सेवेसाठी स्थायिक झाले, पण मन मात्र कायम अमळनेरच्या जनतेत. इतकेच नव्हे तर, आमदारांच्या सौभाग्यवती देखील याच १५ नंबर प्रभागात डॉ. बाविस्कर आणि त्यांच्या कुटुंबाकडून मत मागत आहेत. तर त्यांचा जळगांवला राहण्याचा प्रश्न येतो कुठून ? फक्त निवडणूक आली का तो तिथला, हा ईथला असा विषय रंगवायचा आणि जनतेची दिशाभुल करून स्वार्थ साधायचा. यावरूनच हे स्पष्ट होते की प्रामाणिक, स्वच्छ आणि लोकहिताची ओळख असलेले उमेदवार म्हणजे डॉ. परीक्षीत बाविस्कर यांची नक्कीच आमदारांनी धास्ती घेतलेली दिसते.
नगराध्यक्ष म्हणून २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणे, शहराचे प्रश्न समजून घेणे आणि विकासाला दिशा देणे हे महत्त्वाचे. याबाबत शहर विकास आघाडीचे पत्रक म्हणजे दिशाभूल करने हा प्रकार आहे. आमदार तरी किती दिवस अमळनेर मध्ये राहतात हे सुद्धा जनतेला माहिती आहे. तरी त्यांनी दिलेला उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर जनतेला किती योग्य आणि नामचिन आहे हे सर्वांना ठाऊक आहे.
पत्रकारितेच्या नावाखाली त्यांनी केलेले उद्योग, प्रामाणिकतेचा अभाव आणि २४ तासांच्या “कामगिरी”ची खरी माहिती अमळनेरकरांपेक्षा कोणाला माहिती असेल ? त्याचं लोकशाहीचा चौथा स्तंभला कसा काळिमा फसला आहे हे पण सर्वांना परिचित आहे. म्हणूनच २ डिसेंबर रोजी त्यांना जनता योग्य उत्तर देणार हे निश्चित.
दुसरीकडे, डॉ. परीक्षीत बाविस्कर यांची स्वच्छ प्रतिमा, सामान्य कुटुंब, नम्र व जनतेशी जोडलेलं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कुटुंबाचा, वडील, काका, काकू समाजकार्यातील ठसा अमळनेरमध्ये सर्वश्रुत आहे म्हणून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे, राजकीय हतबलतेचे आणि तथ्यहीन आहेत.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी ओळखून अभ्यासू, चारित्र्यसंपन्न आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेल्या डॉ. बाविस्कर यांना उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब व पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्या विकासाला महत्त्वाचा निधी मिळणार आहे व शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होणार, याबाबत अमळनेरकर खात्रीने बोलतात.
नगरपालिका हे जनतेची सेवा करण्याचे स्थान आहे. जनतेची लूट, कुटनीती आणि भ्रष्ट व्यवहार आणि स्वार्थी उद्योग करण्याचे नव्हे. तर जनतेची सेवा आणि प्रश्न सोडविण्यासाठीचे पवित्र व्यासपीठ आहे. याच तत्त्वावर अमळनेरकरांनी डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
प्रामाणिकता आणि विकासाला मतदान करणार, अमळनेरकर – २ डिसेंबरला इतिहास लिहिणार आहे.




