जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात येणार असून दर्पणकार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच नागपूर येथील माहिती व जनसंपर्क संचालक डॉ. गणेश मुळे यांचे प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील राहणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ आमदार राजू मामा भोळे आमदार अमोल पाटील, निलेश मदाणे जनसंपर्क अधिकारी सचिवालय मुंबई उद्योजक. रजनीकांत कोठारी के.के.उद्योग ज्ञानदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे माजी सर्व अध्यक्ष व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा गौरव मान्यवराचे हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेला सर्व साधारण सभा घेण्यात येणार आहे.
पत्रकार दिना निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हातील सर्व पत्रकार बाधवानी उपस्थिती द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.