
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपतर्फे अभिवादन
जळगाव | प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने बुधवार, दिनांक २८ मे रोजी सकाळी ९.३० वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व माजी महापौर सौ. सीमा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहें”, “वंदे मातरम्” व “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या अभिवादन सोहळ्यास ज्येष्ठ भाजप नेते भगतभाई बालानी, जिल्हा पदाधिकारी राजू मराठे, राहुल वाघ, विशाल त्रिपाठी, प्रकाश बालानी, विजय वानखेडे, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, मंडल अध्यक्षा सौ. दीपमाला काळे, विनोद मराठे, आनंद सपकाळे, संजय शिंदे, शक्तीमान महाजन, सुशील हसवानी, दीपक बाविस्कर, सुनील सरोदे, भरत कर्डीले, उमेश देशपांडे, महेश चौधरी, तुषार सूर्यवंशी, दिलीप नाझरकर, राहुल लष्करे, रवी सोनवणे, सुनील वाणी, अरुण राऊत, केतन मेटकर, जितेंद्र चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.