आरोग्यजळगावसामाजिक

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी परवडणाऱ्या दरात घरपोच सेवा

जळगाव प्रतिनिधी शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि नैसर्गिक उर्जेचा स्रोत ठरणाऱ्या ताज्या फळांच्या प्लेट्सची सुविधा आता जळगाव शहरात सुरू झाली असून “डेलिशस फ्रूट्स प्लेट बाय फ्रूट मॅनिया” या नावाने ही नवी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आहार मिळावा, या उद्देशाने निवडक, ताजी व उत्तम दर्जाची फळे आकर्षक प्लेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

फ्रूट मॅनियाकडून सिंगल फ्रूट प्लेट अवघ्या ९९ रुपयांपासून उपलब्ध असून, नियमित ग्राहकांसाठी साप्ताहिक फ्रूट प्लेट (६ दिवस) ५५० रुपये आणि मासिक फ्रूट प्लेट (२६ दिवस) २३९९ रुपये असे परवडणारे पॅकेजेस सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गोलाणी मार्केट ते बळीरामपेठ, गणेश कॉलनी, रिंग रोड, एम.जे. कॉलेज परिसर, आदर्श नगर, कलेक्टर ऑफिस, आरटीओ ऑफिस तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालये, जिम, शाळा व महाविद्यालयांपर्यंत डिलिव्हरी पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.

ही सेवा सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत उपलब्ध असून, रविवारी सुट्टी राहणार आहे. ताजेपणा, स्वच्छता आणि दर्जा यांना प्राधान्य देत फ्रूट मॅनियाने जळगावकरांसाठी आरोग्याचा नवा पर्याय खुला केला आहे.

फ्रूट मॅनियाचे केंद्र गोलाणी मार्केट, दुकान क्रमांक ५०, ग्राउंड फ्लोअर, अग्निशामक कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोर, जळगाव येथे असून अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी ९७६४०००९०७ / ९७३००००९०७ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
फ्रूट प्लेट बाय फ्रूट मॅनिया’ — ताजेपणाचं आश्वासन, आरोग्याचं बंधन!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button