जळगाव

५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जळगाव मीडिया प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष परवेज पठाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अजमत भाई, शैलेश भाई, वसीम भाई (अल्पसंख्याक उपाध्यक्ष), अफसर शेख, खलील शहा, मुस्ताक दादा, शाहीद भाई, वाफ भाई, नुरे इलाही सर, रोशन बाबा, इजाज सर, फकीरा बाबा, नईम मिर्झा, दानिश मौलाना, योगेश भाऊ आणि शरीफ खाटिक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी “सबका साथ, सबका विकास” हा संदेश देत सामाजिक एकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button