जळगाव शहरातील एमआयडीसी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी ६६/१ येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत 17 बंबांनी आग आटोक्यात आणली. पहाटे पाच वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील डी ८१ सेक्टरमध्ये उन्मेष चौधरी यांची सिद्धिविनायक नावाने चटई कंपनी आहे. रविवारी रात्री नियमितपणे शिफ्ट सुरू असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व आग वाढत जाऊन संपूर्ण कंपनीला तिने कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब व खाजगी कंपनीचे फोमचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
याद्वारे पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.