जळगाव

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड, पदग्रहण सोहळा उत्साहात

जैन श्राविका मंडळाच्या अध्यक्षा पदी प्रतिभा जैन यांची निवड, पदग्रहण सोहळा उत्साहात

राजस्थानी रॅप वॉकचे आकर्षण
जळगाव प्रतिनिधी जैन श्राविका मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य उद्घाटन सोहळा लाल मंदिरात नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळाच्या नूतन अध्यक्षा प्रतिभा जैन आणि सचिव वंदना जैन, रिता पाटणी यांनी औपचारिकपणे पदभार स्वीकारला. कार्यक्रमास अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या, तर विशेष अतिथी अपूर्वा राका, इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्षा उषा जैन यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले.

सुरुवात मंगलाचरणाने पूर्वा चांदीवाल, निकिता चांदीवाल यांनी केली. यानंतर मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रीती चांदीवाल यांनी व्यासपीठावरून आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगितला. नवनिर्वाचित अध्यक्षा प्रतिभा जैन यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि अतिथीगनां चे आभार व्यक्त केले आणि म्हणाल्या, “हे पद केवळ जबाबदारी नसून समाजसेवेची संधी आहे. श्राविका मंडळाला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरणेही झाली, ज्यामध्ये सौम्या जैन आणि कार्यकारिणीने नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदना जैन व रिता पाटणी यांच्या आभार मानले.

अशी आहे कार्यकारिणी
श्राविका मंडळाची नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षा प्रतिभा जैन, सचिव वंदना जैन आणि रीता पाटणी इतर सदस्य उज्ज्वला जैन, संगीता चांदीवाल, अलका चांदीवाल, ज्योती जैन, क्षमा बाकलीवाल रेणू पाटणी पूर्वा चांदीवाल, निकिता चांदीवाल, मोना जैन, निकिता जैन यांचा समावेश आहे. पूर्वा आणि निकिता चांदीवाल सूत्रसंचलन केले. उज्ज्वला जैन, संगीता चांदीवाल, अलका चांदीवाल तीळगूळ दिले. ज्योती जैन, क्षमा क्बाकलीवाल, रेणू पाटणी, प्रियांका चांदीवाल यांनी विविध खेळ खेळविलीत. सदस्यांचे स्वागत मोना जैन, निकिता जैन यांनी केले.

राजस्थानी रॅप वॉकचे आकर्षण

राजस्थानी थीममध्ये कार्यक्रमाचे आयोजन होते. राजस्थानची संस्कृती, कला आणि पारंपारिक पोशाखांचा समावेश होता. राजस्थानी लोकसंगीत आणि नृत्यही झाले राजस्थानी रॅप वॉक हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. समाजातील मान्यवर व महिलांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीने कार्यक्रम संस्मरणीय झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button