जळगाव प्रतिनिधी I युवा सेनेच्या जळगाव शहर समन्वयपदी मिलिंद शेटे यांची निवड युवा सेना सचिव वरुण सर देसाई आणि युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
जळगाव शहर महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
मिलिंद शेटे हे 2006 पासुन उद्धव ठाकरे आणि शिवसेने सोबत एकनिष्ठ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून असून त्यांनी पक्ष वाढीसाठी अखंड कार्य केल्याने त्यांची युवा सेनेचे शहर समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांचे विचार आणि पक्षाचे चिन्ह जनतेसमोर पोहोचवण्याचे काम मिलिंद शेटे यांनी केले असून त्यांची एक निष्ठा आणि प्रामाणिकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहून कार्य करीत राहील असे मनोगत मिलिंद शेटे यांनी निवडीनंतर व्यक्त केले.