जळगावराजकारणसामाजिक

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 सप्टेंबर रोजी आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 सप्टेंबर रोजी आयोजन

जळगाव  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेन्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन 30 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10  वाजता करण्यात आले आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन “खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड मॅनेजमेन्ट, नॅशनल हायवे क्र.06, गणेश कॉलनी, जळगाव” येथे करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन 10वी, 12 वी / सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकांसाठी 430 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्हयातील जैन इरेकेशन बांभोरी, खान्देश मोटर्स, छबी इलेक्ट्रीक. प्रा.लि., मेरीको प्रा.लि., हिताची अॅस्टीमो ब्रेक, सिध्दार्थ कार्बो केमीकल, एस.पी. फॉरमासिटीकल, बंधन बँक, एल. आय. सी., पुणे जिल्ह्यातील ऑटर कंट्रॉल्स इंडिया प्रा.लि,जी.के.एन. फोकर कंपनी, युनायटेड इंडस्ट्रिज इंजिनिअरींग प्रा.लि., महिंद्रा सी.आय.ई. ऑटोमोबाईल लि., कोगेम प्रीसिजन पार्टस इंडिया प्रा.लि., बजाज ऑटो लिमिटेड, स्विगी प्रा. लि. जळगाव अशा नामांकीत आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.

उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या पोर्टलवर लॉगिन करून संबंधित रिक्तपदांसाठी अर्ज करावा. ज्यांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे व बायोडाटासह थेट मेळाव्याच्या दिवशी उपस्थित रहावे.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे केले आहे.

Vasim

२०११ मध्ये फोटोग्राफर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करून आज मुख्य संपादकापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास. सत्य, निष्पक्षता आणि जनहिताच्या पत्रकारितेला प्राधान्य देत जनतेचा आवाज बनण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न. “पत्रकारिता हे केवळ काम नाही, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button