
जळगाव मीडिया न्यूज नेटवर्क: दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मंत्री बावनकुळे हे मोटारीने रेणापूर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथून जळगावकडे प्रयाण करतील. रात्री सुमारे ७ वाजता त्यांचे जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होऊन जळगाव येथे मुक्काम राहणार आहे.
रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.५० वाजता मंत्री बावनकुळे हे मोटारीने शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे रवाना होतील. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या आगमनानंतर नागरिकांकडून निवेदने स्वीकारण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर सकाळी ११.३० वाजता ते मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयातून पातरखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव येथे रवाना होतील. दुपारी १२.१५ वाजता पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी ते करणार आहेत.
दुपारी १ वाजता मंत्री बावनकुळे हे पातरखेडे येथून कासविहीर, ता. जि. धुळे येथे प्रयाण करणार आहेत. या दौऱ्यात दुष्काळग्रस्त भागातील शेतीची पाहणी आणि नागरिकांच्या निवेदनांमुळे महसूल विभागाशी संबंधित स्थानिक प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.




