
लग्नाचे अमिश दाखवून महिलेवर अत्याचार ; अमळनेर तालुक्यातील घटना
जळगाव प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३७ वंशीय महिलेवर लग्नाचे अमिश दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली महिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची ओळख चारूदत्त विलास पाटील (वय 37, रा. कुऱ्हे काकोडे, ता. मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. चारूदत्तने महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्या गावी आणि नाशिक येथे वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.
मात्र यानंतर चारुदत्त याने नकार देईन महिलेस मारहाण आणि शिवीगाळ केली. याप्रकाराला कंटाळून अखेर मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार,चारूदत्त विलास पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.