
धावत्या कारमध्ये अचानक पिस्तुलातून गोळी सुटल्याने तरुण गंभीर जखमी
जळगाव मीडिया न्यूज डेस्क l भुसावळ येथून एक कार्यक्रम आटोपून घरी पाळधी येथे कारने परत जात असताना मागील सीटवर बसलेल्या एकाच्या हातात असलेल्या गावठी पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने पुढील सीटवर बसलेल्या 25 वर्षीय तरुणाच्या उजव्या पाठीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 15 मे रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी शहर पोलिसांनी जखमी तरुणाच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नाजीम फिरोज पटेल वय 23 रा. पाळधी ता.धरणगाव हा जखमी तरुण असून तो त्याचा मित्र तोहिद कय्युम देशपांडे वय 23 रा. पाळधी आणि एक सहकारी असे तीन जण 14 मे रोजी भुसावळ येथील कार्यक्रम आटोतून मध्यरात्री पाळधी येथे परत जात असताना जळगाव शहरातील शिवाजीनगर उड्डाणपणाकडून पाळधी येथे जात असताना मागे बसलेल्या तौहिद देशपांडे त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून अचानक गोळी सुटल्याने पुढे बसलेल्या त्याच्या मित्र नाजीम पटेल यांच्या पाठीमागे गोळी घुसली.
यात नाजिम पटेल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तोहीद देशपांडे याला ताब्यात घेतले आहे.