महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद
जळगांव : – मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे .
स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
*१९ वर्षे मुले* :- १) ४५ किलो खालील वजन गटात दानिश तडवी ( रौप्य पदक ), (२) ४८ किलो खालील ओम बोरसे ( सुवर्णपदक )
(३) ५१ किलो खालील संस्कार अवताडे ( रौप्य पदक ) (४) ५५ किलो खालील आर्यन राऊत ( रौप्य पदक )
तर
*१९ वर्षे मुली*:- (१) ४६ किलो आतील तनिष्का काळे ( सुवर्णपदक ) (२) ५५ किलो आतील गौरी चिंदरकर ( कांस्यपदक ) (३) ५९ किलो आतील श्रद्धा वाल्हेकर ( कांस्यपदक )
(४) ६८ किलो आतील सिद्धी बेडांळे ( सुवर्णपदक)
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री प्रवीण बोरसे ( क्रीडा मार्गदर्शक, श्री छत्रपती पुरस्कार विजेते ) श्री दुलीचंद मेश्राम, श्री निरज बोरसे, महासचिव श्री मिलिंद पठारे, सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, सदस्य श्री अजित घारगे, श्री सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.