गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक : आ. राजूमामा भोळे
अवतारदिन महोत्सव तथा पंचावतार उपाहार कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : श्री गोविंदप्रभु हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात. संत समाजसुधारकांच्या विचारांमुळे आपल्या वैचारिक पातळीचा विवेकी विकास होतो, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.
श्री. गोविंद प्रभू अवतारदिन महोत्सव तथा पंचावतार उपाहार या कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे यांनी उपस्थिती देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी प. पु. विद्वांसबाबा शास्त्री (अध्यक्ष, महानुभव परीषद), प. पू. संतोषमुनी रेलकर महाराज, प. पू. कृष्णाजी महाराज, प. पू. कृष्णराज महाराज, प.पू. जावळे बाबा आदी उपस्थित होते. यावेळी आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. आ. राजूमामा भोळे यांचा महाराजांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
गोविंदप्रभु म्हणजे त्याकाळच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते. इतकं असूनही त्यांच्या जवळ अपार श्रद्धा, कृपा, करुणा, प्रेम, वात्सल्य, ममता आदी गुण होते, असे प्रतिपादन यावेळी बोलताना आ. राजूमामा भोळे यांनी केले. प्रसंगी भाविकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन केले.